Saturday, August 24, 2019

जनसेवा ही ईश्वरभक्ति

जनसेवा ही ईश्वरभक्ति
बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे
नाते सर्वा सांगूया ॥धृ||
कालौघातच उभ्या राहिल्या
भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी
धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाहुनि
समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे
नाते सर्वा सांगूया ॥१॥
ग्रामवासी वा नगरनिवासी
असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली
जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती
पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे
नाते सर्वा सांगूया ॥२॥
कुणी न राहो दुबळा येथे
मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने
बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन
प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे
नाते सर्वा सांगूया ॥३॥

No comments:

Post a Comment