Sunday, August 25, 2019

चला निघु या सरसावोनी देशाच्या उध्दरणी

चला निघु या सरसावोनी

चला निघु या सरसावोनी
देशाच्या उध्दरणी॥ धृ ॥
विसकटलेले अवघे जीवन
खंत जयांना याची
पडती स्वप्ने उत्थानाची
उज्ज्वल भवितव्याची
जागरुक अभिमानी असले
असती जे जे कोणी॥१॥
उधानलेल्या जलधीसंगे
यावा झंझावात
तशी देउनी पराक्रमाला
अभिमानाची साथ
परक्यांची या टाकू पुसुनी
येथिल नावनिशाणी॥२॥
त्रिखंडात दुमदुमुनी जावी
जरि राष्ट्राची कीर्ती
कार्यमग्नता जीवन व्हावे
मृत्यू ही विश्रांती
भेद विरावे स्फुरण चढावे
नवशुभ आकांक्षांनी॥३॥
ईर्ष्या अमुची कधी नसावी
क्षणिक पुराचे पाणी
कसे व्हायचे अशी नसावी
खचलेली जनवाणी
हासत जावे काट्यावरुनी
तरुणांनि अनवाणी॥४॥
उठता आपण नमतिल विघ्ने
महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन
तुंग हिमाचल माथा?
विलंब का मग आणु वैभव
लीलेने जिंकोनी॥५॥

No comments:

Post a Comment