Sunday, August 25, 2019

ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करिते वृष्टी

ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करिते वृष्टी
मनात ज्यांच्या नित्य तरंगे भवितव्याची सुंदर सृष्टी॥१॥

क्षितिजे अभिनव गाठायाते पडते ज्यांचे पुढती पाउल
असे बनू या निश्चय करुनी परिस्थितीचि घेउनि चाहूल॥२॥

माणुसकीचे घडता दर्शन उदात्ततेचे करु या वर्तन
सर्प कलिया ग्रासू बघता फणेवरी करु तांडव नर्तन॥३॥

ज्या दृष्टीतुनि सौजन्याचे मधुर चांदणे नित्य पडावे
तीच दृष्टी दुष्टावर वळता तये भयाने दूर पळावे॥४॥

ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या पाठीवरती
पशुता दुसता तोच हात क्षणि दृढ वज्राची व्हावी मुष्टी॥५॥

शांत मनाने टीका निंदा स्वकीय म्हणुनी घेतो ऐकुनि
परक्यांनी परि उणे बोलता ज्वालामुखि जणू उसळू भडकुनि॥६॥

हीच आमुची होती नीती अनुसरताही पुढती रीती
कोण शके मग रोधायाला अप्रतिहत ही अमुची प्रगती॥७॥

प्रभुत्व सार्या पृथ्वी वरती या देशाचे माणुसकीचे
स्थापित व्हावे हा ईर्ष्येने पाउल पुढती टाकायाचे॥८॥

झाला निश्चय झाला निश्चय जीवन सारे या ध्येयास्तव
अति बलशाली अखंड भारत स्वप्न सुमंगल करु हे वास्तव॥९॥

झाला निश्चय कठोर निश्चय लक्ष लक्ष नव ह्रदयांमधुनी
पराक्रमाने प्रिय भगवा ध्वज अखंड ठेवू डोलत गगनी॥

No comments:

Post a Comment