आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली ॥धृ.॥
पिवळ्या खल सर्पाने केला गोष्टींचा देखावा,
गळ्यात घालुनी हात साधला क्रूर आपला कावा,
या अधमाचा भ्याड धर्म का? शब्दाला जागावा,
आज उठे गरुडांची सेना सर्पांना निर्दाली॥१॥
विंध्य हिमाचल गंगा यमुना सर्व पेटली राने,
गर्जत हर हर समुद्र उठले पेटुनिया त्वेषाने,
रक्ताच्या अक्षरात लिहिली इतिहासाची पाने,
मर्दांची मनगटे जाहली जळत्या वज्रमशाली॥२॥
उदो उदो जगदंबे आता लाव तुझा अंगारा,
वीर निघाले संसारावर ठेवुनियाच निखारा,
प्राणांचा नैवेद्य तीर्थ तुज या रक्तांच्या धारा,
उदो उदो जगदंबे आता गाड शत्रू पाताळी॥३॥
No comments:
Post a Comment