राष्ट्रोन्नति एक मात्र ध्यान हेच चालु दे
राष्ट्रजीवनात जीव जीवनान्त पाहु दे॥
सोड भोग मोह स्वार्थ देह तुझा झिजो परार्थ
चंदनी सुगंध मंद आसमंत भारु दे॥१॥
ध्येयभाव जो मनात येउ दे तुझ्या कृतीत
कार्याची कीर्तिध्वजा दूरदेशी फडकु दे॥२॥
कर्मयोग हा ज्वलंत स्वीकारी तू नितांत
दिव्य तुझ्या हवनातुनि दीपमाळ उजळु दे॥३॥
नकोत अन्य यज्ञ याग त्याग हाच मान याग
बंदिवान आत्मतेज आज मुक्त होउ दे॥४॥
याचा ऑडिओ मिळू शकेल का ?
ReplyDelete