यापुढे यशाकडे
यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची
अखंड झेप घ्यायची॥धृ॥
माणसेच ना आम्ही क्वचित् काली शिरायचा
राखुनी परी विवेक कलह आवरायचा
शत्रुला प्रवेशण्या कधी अशा न संधी द्यायची॥१॥
बैसता प्रहार शत्रु करितसे गयावया
संधी साधुनी परंतु शब्द मोडी लीलया
शत्रुची कधी अशा पुन्हा न गय करायची॥२॥
ओठी पंचशील आणि द्यावया निघे मिठी
चीन दुष्ट लावितो गळ्यास तांत शेवटी
या अशा नराधमास ना क्षमा मिळायची॥३॥
संकटे असंख्य हीच पौरुषास पर्वणी
वाटते जयास धन्य धन्य तेच अग्रणी
ना कधी पुन्हा अशी सुवर्ण संधी यायची॥४॥
अंतरात विमलभक्ति मातृभक्तिची वसे
राष्ट्र तरिच शुध्द चरित नित्य सिध्द होतसे
वैभवार्थ शक्तिची उपासना करायची॥५॥
जगरुकतेविना स्वतंत्रता नती टिके
मुक्त राष्ट्रही ठरे पराक्रमाविना फिके
शौर्य धैर्य प्रगटताच दुदुंभी झडायची॥६॥
No comments:
Post a Comment