समाजजीवन भारुनी टाकू
चैतन्याने मानाने
वैभवशाली भवितव्याला
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने....
दश शतकांचे दैन्य टाकुनी
जागृत करूया जनशक्ती
पराक्रमाची अन प्रतिभेची
जगास दावू अभिव्यक्ती
राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया
पुन्हा एकदा यत्नाने
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने ....
सागरलाटा रोज सांगती
नव्या युगाची आव्हाने
गिरीशिखरातुनी ऐकू येती
मायभूमीची जयगाणे
ती आव्हाने पेलायला
उभे राहूया ऐक्याने
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने ....
परिश्रमाचा सेतू बांधू
संघटनेच्या दलभारे
नको कुणाची कृपा आपणा
आक्रमू धरती नभ सारे
व्यक्ती व्यक्तीच्या कर्तृत्वाला
उधाण आणू सहजपणे
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने .....
भेदभावना भिंती पाडू
समतेची गाथा गाऊ
उच्चनिचता गाडूनी टाकू
नवीन दिशा नव गती घेऊ
कलीकालावरी मात करूया
तेज भारल्या भक्तीने
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने .....
समाजजीवन भारुनी टाकू
चैतन्याने मानाने
वैभवशाली भवितव्याला
नटवू निज कर्तृत्त्वाने
नटवू निज कर्तृत्त्वाने....
No comments:
Post a Comment