जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवराय ॥धृ॥
तू रक्षियले देशाला
न्यायनीती आदर्शाला
तू जागविले धर्माला ....१
दुष्ट आक्रमक लोळविले
सज्जनांस तू वाचविले
राज्य आपुले स्थापियले....२
जात-पात तुज मान्य नसे
प्रांतभेद तुज ठाव नसे
सर्वधर्मसमभाव असे....३
महापराक्रमी तूच खरा
राजनीती चाणक्य खरा
त्यागाचा आदर्श खूप...४
देशाच्या एकत्वाचे
ध्येयपूर्तता करण्याचे
राज्य हिंदवी मोलाचे...५
शिवरायांचा जयजयकार
जिजामातेचा जयजयकार
भारतभूचा जयजयकार....६
जय भवानी जय शिवराय
No comments:
Post a Comment