Sunday, August 25, 2019

आज एकदा पुन्हा सिंहनाद होऊ दे

आज एकदा पुन्हा, सिंहनाद होऊ दे,
आज एकदा पुन्हा, तुतारी भेरी वाजू दे
मातृभूमी संकटात आहे. सज्ज तर आपण व्हायलाच पाहिजे.

उत्तरेस गर्जतो, नगाधिराज सांगतो
आग अंतरी प्रचंड, शत्रु मजसी वेढितो
मातृभूस रक्षिण्यास सैन्य सज्ज होऊ दे
आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

आज स्वप्नभूमी कर्मधर्मभूमी होऊ दे,
सुषुप्तीतुनी जिवाशिवास जाग येऊ दे,
मोहपटल सारूनी, दुरी तमास जाऊ दे
आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजु दे
आज लागला सुरुंग, पोखरीत ऐक्य तो,
शौर्य, धैर्य, वीर्य, स्थैर्य, स्वार्थची विनाशितो,
सूर्यबिंब ग्रासण्यास राहु केतु सिद्ध ते
आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

आज कोण जन्मले पाहिजेत?
आज राम कृष्ण आज रामदास जन्मू दे,
आज भरत आज पार्थ शिव मनात जागू दे,
कुरुक्षेत्र भरत भू, पुन्हा पुनीत होऊ दे,
आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

No comments:

Post a Comment