Sunday, August 25, 2019

हिंदु विचार व्हावा उत्क्रांत अन् प्रबुद्ध

हिंदु विचार व्हावा, उत्क्रांत अन् प्रबुद्ध
निज कार्य होत जावे, समयानुकूल‌ सिद्ध

हो नित विचारमंथन, परिपाठ हाच इथला
त्यागी ऋषी-मुनींनी, आदर्श हाच दिधला
हा वारसा युगांचा, हिंदु विचार शुद्ध

करु आजला समिक्षा, अवलोकुनी अतीत
हा सत्यमार्ग अपुला, होते सदा प्रतीत
आता न थांबु आम्ही, वचनी सदैव बद्ध

आणू नवीनता अन्, कल्पक विचार येथे
चैतन्य मानसीचे, बळ साधनेस देते
पथ चालु हा निरंतर, होईल ध्येय साध्य

No comments:

Post a Comment