Sunday, August 25, 2019

भारत देश महान अमुचा

भारत देश महान अमुचा

भारत देश महान अमुचा
भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे
राम कॄष्ण हनुमान॥धृ॥
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥

No comments:

Post a Comment