!! देशासाठी जगायच रं !!
शिवबानं सांगावा धाडलाय रं !
वेळ पडली तर मरायचं रं !
धर्मासाठी झुंजायचं रं ..!!धृ !!
देवाधर्माची आन हाय , बेईमान कोणी होयचं नाय !
आपल ईमान सोडायचं नाय , एका दिलान नादायचं रं !
देशासाठी जगायचं रं ..!!१!!
तोरणा घेऊन राजानं , तोरण बाधलं राज्याचं !
आई भवानीच्या पुण्याईचं , स्वराज्य होय मर्दानुरं !
देशासाठी जगायचं रं ..!!२!!
शिवाजीराजानं केलं र काय ? खानाचं प्वाट फाडलं रं !
मामाची बोटे छाटली रं , देवीला बोकडाचा निवद रं !
देशासाठी जगायचं रं ..!!३!!
देवी नवसाला पावली रं , रामाचं राज्य आलं रं !
रावणाची मस्ती जिरली रं , शिवबाचं राज्य आलं रं !
देशासाठी जगायचं रं ...!!४!!
No comments:
Post a Comment