माते तुझ्याच चिंतनी चित्त नित्य राहुदे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
तूच देवता आम्हा धारणा मनी तुझी
ध्येयमंदिरात या मूर्ती दिव्य ही तुझी
रूप हेच लोचणी असेच नित्य राहुदे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
तुझ्याच भक्तीचा सुगंध अंतरात दरवळे
कीर्ती दुंदुभी जगी निनादते तुझ्या बळे
अजेय शक्ती दे आम्हा ध्येय धुंद होऊदे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
ब्रम्हतेज जागवी दशदिशा प्रकाशु दे
अंध:कार वेधूनी ज्ञानसूर्य पाहुदे
मोह तिमिर छेदूनी कर्मयोग उजळू दे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
असुरमर्दिनी जगी धरती धात्री तू आम्हा
अमरता नको मुळी मृत्यूची नसे तमा
नष्ट देह हो जरी फिरुनी उदरी जन्म दे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
माते तुझ्याच चिंतनी चित्त नित्य राहुदे
कोटी कोटी कंठ हे तुझेच गीत गाऊदे
|| जयतू हिंदुराष्ट्रम् || प्रभो शिवाजी राजा ||
Ya geetach chal mile ka?
ReplyDeleteया गीताच्या चालीसाठी मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा ७७१८८१८२२५
Delete