धर्मव्रतीनो धर्मरक्षण्या सिद्ध अता व्हा रे।
धर्मसंगरी पराक्रमाची शर्थ करु या रे।।
मायावी कुणी मारिच येथे रूप विविध घेऊनि
सभोवताली चालू आहे नर्तन सैतानी
शील सतीचे रक्षण करण्या वीरव्रती या रे।।१।।
रूप मनोहर बाह्य दिसे जरी अंतरंग काळे
भारतभूला नष्ट कराया कुटिल भ्रष्ट चाळे
धर्मक्षेत्री या सावध राहुन स्थितप्रज्ञ व्हा रे।।२।।
मानवतेच्या कल्याणाचा दिला मार्ग ऋषींनी
सत्य न्याय अन् समतेचा हा संघमंत्र गाऊनि
ऋषीमुनिंचे संतांचे अम्ही पुत्र जाणुया रे।।३।।
धर्म कोणता अधर्म तोही समजुनिया घेऊ
हिन्दु अम्ही अन् हिन्दुत्वाला उमजुनिया घेऊ
धर्मजागरण घडता होईल रामराज्य सारे।।४।।
उपेक्षित कुणी वंचित कोणी दलित कुणीही नाही
एक मातृभू एक पुण्यभू अमृतसुत आम्ही
नव्या युगाचा नवा धर्म हा जगी गर्जुया रे।।५।।
Sunday, August 25, 2019
धर्मव्रतीनो धर्मरक्षण्या सिद्ध अता व्हा रे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment