शाखेत जाऊया र
पावलं तालात टाकूया र
संघात जाऊया र
सेवा या देशाची करूया र ॥ धृ ॥
शाखेत खेळू खो खो हू तू तू
जगण्या मारण्याचा जाणूया हेतू
खो देऊ झकास गनिमाला र
सेवा या देशाची करूया र ..॥ १॥
छोट्यातूनी काम मोठं साधायच
देशासाठी सारं झोकून टाकायच
म्हणून शान संघात जाऊया र
सेवा या .....॥ २ ॥
मोठी आई आमुची भारत माता
आमच्याविना तिचीकोणाला चिंता
परम वैभवा नेऊया र
सेवा या .....॥ ३ ॥
लाहोर घेऊ घेऊ कराची
सिंधू माता आता मुक्त करायची
अखंड भारत करूया र
सेवा या ....॥ ४ ॥
No comments:
Post a Comment