असु अम्ही सुखाने
असु अम्ही सुखाने पत्थर पायातील
मंन्दिर उभविणे हेच आमुचे शील॥धृ॥
आम्हास नको मुळी मान मरातब काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाहि
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयमंदिरातील ॥१॥
वृक्षांच्या शाखा उंच नभांतरि जावो
विश्रांतिसुखाते विहगवृंद वरि घेवो
जरि देईल टकरा नाग बलाने देवो
करु अमर पाजुनी रस पाताळातील ॥२॥
जरि असले अमुचे रुपहि ओंगळवाणे
सोसून टाकिचे घाव बदलवू जिणे
गुणसुमने आम्ही विकसित करु यत्नाने
पावित्र्ये जीवन का न होइ तेजाळ॥३
No comments:
Post a Comment