हिन्दूजनांची सज्जनशक्ती
सर्वांगांनी बहरू दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
समजत नाही इतिहासातील
सुवर्णयुग सरले कैसे
उदासीनता मतभेदांचे
दुर्गुण हे शिरले कैसे
उपेक्षिली समता ममता तर
लुटती परके समजू दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
जे नशिबाचे गुलाम त्यांच्या
ऐहिक उर्मी मावळती
खड्ग येथले परास्त होई
उदिम व्यापारा गळती
उद्यम व्यापारांचे वैभव
जनामनान्ततरी पसरू दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
हिन्दू सोशिक आणि समंजस
सात्विकता त्यांची वृत्ती
आक्रमकांच्या हिंस्र चढ़ाया
रोखन्यास अपुरे पड़ती
सत्वापाठी क्षात्रबळाचे
संघकवचही संचरू दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
दुनिया बळवंतांची अंकीत
बळ युवकांचे यशदायी
निःस्पृह सज्जन एकवटावे
तर वैभव दुष्कर नाही
जगज्जयी भारतभूमिचे
स्वप्न अंतरी उतरु दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
हिन्दूजनांची सज्जनशक्ती
सर्वांगांनी बहरू दे
शाखा-शाखांवर भगवद्ध्वज
युवाबळाने लहरू दे
No comments:
Post a Comment