Sunday, August 25, 2019

उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे

उसळत्या रक्तात माँ
ज्वालामुखीचा दाह दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे

कीर्तीचे आकाश जेव्हा
चंद्र ज्योतींनी झळाळे
वाधनाची लाट ती
पायावरी येऊन लोळे
हात हा सोडू नको
निर्मोही ता मज त्यात दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

विसरू दे माझ्यातला मी
तेत भक्ती उसळू दे
रंग तू मी रंगणारा
दंग त्यातच होऊदे
कापराचे भाग्य मजसी
अनुभवा आणून दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

क्षण कधी तुज विसरलो वा
लागली निद्रा कधी
जागवी मज हलवूनी वा
ताडूनी ही तू तधी
चंदनाची खूण माझ्या
मस्तकी उठवून दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

ध्येयपथ जो चाललो मी
विसर त्याचा मज नसावा
गीत आणि स्वर तुझा
माझिया कंठात द्यावा
तवपदी हो सांगता ही
जीवनाची आस दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

चेतलेला पोत आता
विझून जावा ना कधी
निर्झाराला सागराचा
विसर व्हावा ना कधी
वैभवाचे दान देता
वैष्णवाचे वाण दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

उसळत्या रक्तात माँ
ज्वालामुखीचा दाह दे
वादळाची दे गती पण
भान ध्येयाचे असू दे
उसळत्या रक्तात माँ....

No comments:

Post a Comment