Sunday, August 25, 2019

उजाळिले तू तममय जीवन संघयुगाचा शालीवाहन

उजाळिले तू तममय जीवन

उजाळिले तू तममय जीवन
संघयुगाचा शालीवाहन॥धृ॥
कर्मयोग तव ज्वलंत प्रेरक
मातीतुनही उठले सैनिक
वाण सतीचे घेउनि दाहक
प्रकाश फुलवित अंधारातुन॥१॥
सामर्थ्यातुन तत्त्वाचा जय
धर्म रक्षण्या शक्तीसंचय
राष्ट्र आपुले हे मॄत्युंजय
तूच दाविले निजहवनातुन॥२॥
हिंदुत्वाचा विशाल सागर
विभिन्न्तेच्या लाटा वरवर
परी अंतरी एकच सुस्वर
जागविले हे सत्य सनातन॥३॥
तव शव्दांचे अमृतसिंचन
देशाचे या फुलले यौवन
पुरुषार्थाचे जगण्या जीवन
अगणित सेवक झिजले कणकण॥४॥
महिमा आता संघयुगाचा
विशालतेचा उदात्ततेचा
जीवन इथले बहरविण्याचा
तुझि तपस्या मंगल पावन॥५॥

No comments:

Post a Comment