झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाउल पुढेच टाका॥ धृ ॥
तोंड लागले आज लढ्याला चहुबाजूंनी येइल घाला
छातीवरती शस्त्रे झेला फिरु नका रे डरु नका॥१॥
शपथ तुम्हाला रामधनूची श्रीकृष्णाच्या सुदर्शनाची
शूल परशुची शिवखड्गाची विजयाच्या त्या ऐका हाका॥२॥
निशाण भगवे उंच धरा शूरपणाची शर्थ करा
लढाच किंवा रणी मरा बहाद्दरांनो मरणा जिंका॥३॥
No comments:
Post a Comment