Sunday, August 25, 2019

प्रताप शाली शिवसम्राटा विश्ववंद्य वीरा

प्रताप शाली शिवसम्राटा

प्रताप शाली शिवसम्राटा विश्ववंद्य वीरा
भावभक्तिने राष्ट्र अर्पिते मानाचा मुजरा॥धृ॥
पाषाणांना गडागडावर
पेटविले तू घालुन फुंकर
त्यातुनि उठल्या ज्वाला
नाशित पारतंत्र्य -तिमिरा॥१॥
सत्तांधांचा सेनासागर
खवळुनि आला सह्याद्रीवर
लपवुनि परि शिर तव चरणावर
फिरला माघारा॥२॥
खडे शत्रुदळ सीमेवरती
आणि फितुरिला येई भरती
अशा घडीला राजनीति तव
देवो सुविचारा॥३॥
छत्रपती तू तू पुरुषोत्तम
अभंग संकटि हिमालयसम
घराघरातुन विक्रम -गाथा
घुमते तव वीरा॥४॥
स्वातंत्र्याचा तू उद् गाता
जनकासम तू विरक्त नेता
ध्वज भगवा तव ग्वाही
देई विजयाची शूरा॥५॥
--Archana App

No comments:

Post a Comment