भक्तिपुर्ण हे अवघे जीवन
भक्तिपुर्ण हे अवघे जीवन
मातृभुमिच्या पदमकमलाशी
तेवत तेवत मधुभावाने
एकरुप हो परमात्म्याशी॥धृ॥
राष्ट्रसमर्पित जीवन जगणे
सद् धर्माचे तेज फुलविणे
या ध्येयास्तव अविरत श्रमणे
जीवनपूजा ही अविनाशी॥१॥
जागृत होता समष्टि शंकर
दानवतेला मिळे न अवसर
मंगलतेने गाता सुस्वर
मीलन होइल चित्त तत्वाशी॥२॥
साधना ही जीवनाची
देवत्वाला जगविण्याची
क्षणिकांतुनि त्या चिंतनाची
वाट पुसावी भगवंताशी॥३॥
No comments:
Post a Comment