Sunday, August 25, 2019

ध्येय पथावर सतत चालतो वीरव्रती आम्ही

ध्येय पथावर सतत चालतो वीरव्रती आम्ही
वैभवशाली भरतभूमीला ध्यातो अंतरयामी ।।

प्रतिदिन आमुची शक्तिसाधना गुरूवर ध्वज भगवा
वादळातही खडतर मार्गी तेवत ज्ञान दिवा
सत्चारित्रे क्षण क्षण लावू भगवंताच्या कामी ।।

चित्तामध्ये चिंतन करूया का आम्ही हरलो
ऋषीमुनींच्या देशामध्ये हीनदीन झालो
आजपुन्हा तो वन्ही चेतवू उजळू ज्योतीतमी ।।

कुणी न मोठा नाही छोटा आम्ही सारे बंधू
जाती पंथ भाषा पक्षातून आम्ही सगळे हिंदू
श्रेष्ठ आमुचे पूर्वज आम्हा हीच पूण्यभूमी ।।

बंधू-बंधू हे विकसित करूनी एकसूत्री बांधुनी
उदात्तमंगल ते ते घडवू हीन सर्व जाळुनी
तेजोपासक अमृतसूत आम्ही पुरूषार्थी विक्रमी ।।

1 comment: