लक्ष पावालांसवे चालती
लक्ष नवी पावले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
भगिरथाने उग्र व्रताने
स्वरगंगा आणली
गंगउघापरी संघधारही
या भूमीवर पातली
अगणित भगीरथांचे यास्तव
अविरत व्रत चालले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
भागीरथीच्या जळी मिळाल्या
लहान मोठ्या धारा
अभिषेकाने मातृमंदिराचा
भिजला गाभारा
समर्पणातून संघउघावर
ध्येयदिप तेवले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
आव्हानांचा पाषाणावर
खोदु शिल्पे नवी
मरुभुवरीही ऐसें झिरपू
फुटेल नवी पालवी
सद्भावाचे मांगल्याचे
शिंग आम्ही फुंकले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
जगन्नाथ हा समाज होऊनी
स्वये ओढीतो रथा
चाकोऱ्या कुप्रथा मोडून
धरू समरस सत्पथा
हिंदुत्वाच्या एकत्वाचे
ग्रहण आज संपले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
जणी मीसळूनी जनांसावे
चालणे हीच साधना
संवादातून विचार जागर
कृतीने संवेदना
शंखनाद ऐकून शुभंकर
शत्रू हृदय कापले
दूर जरी ध्येयाचे मंदिर
कळस दिसू लागले
कळस दिसू लागले
No comments:
Post a Comment