*अमूर्त मूर्त मूर्तिमंत*
अमूर्त मूर्त मूर्तिमंत
तुजसमान होऊ दे
येत शरण तव पदांसि
देशकार्यि विरमु दे॥
उमलतिल ह्या कळ्या
हळूहळूंचि पाकळ्या
तत् सुगंध तुजसमान
सर्वदूर पसरु दे॥१॥
पुष्पफले नको आम्हासि
अर्पु दे तुझ्या पदांसि
स्वार्थाचे होमहवन
तुजपुढेचि होउ दे॥२॥
आम्हासि तूच ध्येय देव
सेवु धरुनि भक्तिभाव
पूजने तुझ्या आम्हास
देवरुप होउ दे॥३॥
अससि भव्यदिव्य दीप
तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही
ह्रदयांतरि उजळु दे॥४॥
करुनिया तुझ्यासमान
होउ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतिचे
संरक्षणचि होउ दे॥५॥
No comments:
Post a Comment