Saturday, July 4, 2020

Jis din soya rashtra jagega

जिस दिन सोया राष्ट्र जगेगा,
दिस दिस फैला तमस हटेगा,

भारत विश्व बंधु का गायक
 भारत मानवता का नायक
 सदियों से था, युगों रहेगा,
 दिस दिस फैला तमस हटेगा
जिस दिन सोया राष्ट्र जगेगा
 दिस दिस फैला तमस हटेगा

वैभवशाली जब हम होंगे,
नहीं किसी से हम कम होंगे
क्यों ना फिर गंतव्य मिलेगा,
 दिस - दिस फैला तमस हटेगा
जिस दिन सोया राष्ट्र जगेगा,
दिस दिस फैला तमस हटेगा

हम सबकी तो राह एक है,
कोटि हृदय और भाव एक हैं,
बात हमारी विश्व सुनेगा,
दिस दिस फैला तमस हटेगा
जिस दिन सोया राष्ट्र जगेगा
दिस दिस फैला तमस हटेगा

Sunday, March 22, 2020

कार्यकर्ता - हितोपदेश

कार्यकर्ता - हितोपदेश

खूप काम करावे । परिचय संबंध वाढवावे । धनिष्ट मित्र बनवावे । कार्यकर्ते ॥१॥

नाना लोक नाना स्वभावे । काळेबेरे उजवे डावे। सर्वांचे नीट राखावे । अवधान ॥२॥

छोटे मोठे जुने नवीन । सर्वाशी जुळवावी धून । कोणासही न म्हणावे हीन । निष्ठेमुळे ॥३॥

पूर्वग्रह धरू नये । आपलीच पुंगी वाजवू नये । सतरा फाटे फोडू नये । विचारात ॥४॥

प्रेमाशिवाय रागवू नये । उगीच जास्त लाडवू नये । कधीच कोणाचे दुखवू नये । कोमल मन ।।५।।

नेहमी गोड बोलावे । स्पष्ट विचार मांडावे। पण तत्पूर्वी स्थान, लोक पहावे । मग बोलावे ॥६॥

स्वतः टीका करू नये । परनिंदा मनात ठेवू नये । स्वतःचे वागणे व्हावे । शक्यतो निर्दोष ।।७।।

आपला उत्साह दिसावा । लोकांचा वाढवावा । एक एक उभा करावा । कार्यकर्ता ॥८॥

वेळ लागेल हरकत नाही । फळ उशिरा मिळेल काही। पण संच उभा करणे पाही। नेहमीच ।।९।।

एकटाच खप खप खपला । मागे कोणी नाही उरला । जसा पाण्याबरोबर मुरला । बुडबुडा ।१०।।

म्हणून मुख्य संच करा । क्षणिक लाभ न मनी धरा । हळू हळू पण पक्का भरा । पाया कामाचा ॥११॥

काम करता उत्साह वाढे । आमच्या निश्चयाचे घोडे । नेहमीसाठी पुढे पुढे । पुढेच धावावे ।।१२।।

वाट घेतली पुण्ण्याची । जरी अवघड तरी पराक्रमाची । ती कधी न व्हावी । परतीची ।।१३।।

वाचन श्रवण मनन । असो नियमित जीवन । योग्य शरीर बुद्धी मन । याने घडे ॥१४॥

परंतु हे सर्व काही । झेपते त्यापेक्षा थोडे अधिक साही। म्हणजे त्याचा योग्य होई । परिणाम ।।१५।।

लोकांपेक्षा फार वेगळे नसावे । अगदी लोकांसारखे न व्हावे। मर्यादा राखून वागावे । सर्वाशी ॥१६॥

 प्रत्येकाकडून शिकावे । अनावश्यक ते टाकून द्यावे । डोळे उघडे ठेवून पहावे । सर्व लोक ।॥१७॥

असो काय लिहू अधिक । सूज्ञ जाणत्यांना अधिक । तुमच्यापासून घेतले एक । तेच लिहिले ।॥१८॥।

मा. डॉ. मोहन मधुकर भागवत सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ